उदय हुआ धरम का

प्रेम असावे तर असे



प्रेम असावे तर असे



प्रेम असे असावे की,

नाही त्यात भेद भाव

कधीही प्रेमात 

देऊ नये, पैशांना भाव


प्रेम असे असावे की,

प्रेम न तोलले जावे पैशातं

खरे प्रेमी असे कधीही

होऊ देत नाही प्रेमातं


प्रेम असे असावे की,

नको प्रेमात खोटं

प्रेमाची भावना जाणण्यासाठी

प्रेमींचे मन असावे मोठं


प्रेम असे असावे की,

नको कोणावरही सक्ती

मनापासून प्रेम करण्यासाठी

असावी प्रेमात प्रेमभक्ती


प्रेम असे असावे की,

प्रेमीचें मन जुळणार

कधीही न होता

प्रेमात हॄदय तुटणारं


ऐका हो ऐका, प्रेमीनो

हा मोलाचा प्रेम संदेश

खरचं, आयुष्यात

प्रेम असावे तर असे


@ Nir Anand







टिप्पणियाँ